Tiranga Times Maharasstra
राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठे चढ-उतार पाहायला मिळत असून, आता पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 24, 25 आणि 26 डिसेंबर रोजी राज्यातील काही भागांत जोरदार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
याच काळात काही जिल्ह्यांमध्ये कडाक्याची थंडी जाणवणार असून, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात शीतलहरींचा प्रभाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. संपूर्ण डिसेंबर महिन्यात थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
गेल्या काही दिवसांत राज्यातील अनेक भागांत किमान तापमान एक अंकी पातळीवर पोहोचले असून, काही ठिकाणी गेल्या दहा वर्षांतील विक्रम मोडले गेले आहेत. विशेषतः शहरी भागात थंडीची तीव्रता वाढली असून नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
